ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्याची गंभीर लक्षणे नाहीत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सर्वांना सर्तक राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या कोरोनाच्या टास्क फोर्सचे स्ट्रॅटेजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सर्व्हिसेसचे सल्लागार सबाइन कापसी यांनी भारतात कोरोनाची स्थिती स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्यानं तिथं संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले. कोरोना डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संंख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. तर, रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँमधील कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला नसला तरी तिथल्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोनाव्हायरसचा नवीन प्रकार जेएन 1 हा जगात वेगाने पसरत आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव हा चिंतेचा ठरला विषय आहे. विशेषतः ज्या देशांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात, तिथे हा विषाणू हातपाय पसरत आहे. हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोविड-19 चा हा नवीन प्रकार आढळून आला आहे. पण, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे, फिरण्यावर कोणतेही बंधन नाही. पण सावधगिरी आणि दक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. सिंगापूरमध्ये एका आठवड्यात कोरोना व्हायरसची प्रकरणे जवळपास 14200 वर पोहोचली आहेत. येथे दररोज रुग्णांची संख्या 100 वरून 133 पर्यंत वाढत आहे. कोरोनाचे ‘LF.7’ आणि ‘NB.1.8’ विषाणू येथे पसरत आहेत.