मोठी सुवर्णसंधी ! नाबार्डमध्ये मेगा भरती, ‘ही’ पदे भरली जाणार , वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 108 पदे ही भरली जातील. ग्रुप-सी ऑफिस अटेंडंटच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालीये. 21 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. www.nabard.org या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

www.nabard.org याच साईटवर आपल्याला भरतीची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यासोबत भरतीसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये.

18 ते 3o वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, दहावी पासची गुणपत्रिका, पासपोर्ट फोटो लागतील. 450 रुपये फीस या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना भरावी लागेल.

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावे लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा.

.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *