गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतोय.शुक्रवारी (13 डिसेंबर) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. आजदेखील (14 डिसेंबर) सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.शनिवारी सोन्याच्या दरात 550 रुपयांनी घट झाली आहे. या घसरणीसह 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्ली, राजस्थान, यूपीमध्ये 79,000 रुपयांच्या आसपास घसरला आहे.24 कॅरेट सोनेदेखील 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह मुंबई, चेन्नई, बिहार या भागात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 72,300 रुपये झाला आहे.दुसरीकडे चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज चांदीचा भाव प्रतिकिलो 93,500 रुपये झाला आहे.कालच्या तुलनेत चांदीचा भाव 3,000 रुपयांनी घसरला आहे. काल चांदीचा भाव 96,500 रुपये होता