बीड पोलिसांचा मोठा निर्णय, नेमप्लेटवरुन काढून टाकले आडनाव

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बीड पोलीस Beed Police) आता वर्दीत असताना छातीवरील नेमप्लेट (Beed Police Nameplate) वापरताना केवळ स्वत:च्या नावाचा उल्लेख करतील. त्यांच्या नेमप्लेटवरुन आडनाव दूर झालेले पाहायला मिळेल. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे अधीक्षकांनी स्वत:पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. त्यांनी आपलेड आडनाव हटवत केवळ नवनीत येवढेच नाव धारण केले आहे. जिल्ह्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कर्तव्य बजावताना आडनावामुळे अडचणी येतात. अनेकदा त्यांच्याकडे पाहण्याचा सामान्य नागरिकांचा दृष्टीकोणही बदलतो. ज्याला जातीय किंवा सामाजिक किनार असते, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत म्हणाले.

सामाजिक सलोखा आणि कर्तव्यपालनासाठी महत्त्वाचा निर्णय
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर समाजमन ढवळून निघाले. केवळ बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातही तीव्र संताप पाहायला मिळाला. त्यासोबतच या जिल्ह्यातील गुन्हेगारी किती भयानक पद्धतीने वाढली आहे, हे सुद्धा दिसून आले. दरम्यान, या गुन्हेगारीस जातीय पार्श्वभूमी असल्याचेही पुढे आले. धक्कादायक म्हणजे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांकडे जातीय नजरेतून पाहिले गेले. इतकेच नव्हे तर कर्तव्य बजावताना वर्दीत असलेल्या पोलिसांच्या छातीवरील नेमप्लेट पाहून नागरिक त्यांच्यासोबत सहकार्य आणि वेगळे वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. या वर्तनास जातीय आणि धार्मिक पार्श्वभूमी असल्याचेही लक्षात आल्याने पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नवनीत कॉवत यांचे निरीक्षण आणि निर्णय
प्रसारमाध्यमांशी बोलताना बीडचे पोलीस अधीक्षक नवीनत यांनी सांगितले की, बीडमध्ये सामाजिक अंतर वाढले आहे. ज्याची झळ पोलीस कर्मचाऱ्यांनाही बसताना पाहायला मिळते. अनेकदा आडनावाच्या उच्चारावरुन जात लक्षात येते. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्या नावाने संबोधण्याचा निर्णय घेतला. नवनीत कॉवत हे बीड जिल्ह्यात केवळ तीन महिन्यांपूर्वीच पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना आडनावाने नाही तर नावाने हाक मारण्याची प्रथा सुरु केली. कार्यालयीन परिपत्रके, पत्र देखील एकेरी नावानेच निघण्याची सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांमध्येही आपुलकी वाढीस लागल्याचे पाहायाला मिळत असल्याचे कर्मचारी सांगतात.

पोलीस अधिकारी दालनाबाहेरील पाट्याही बदलल्या
उल्लेखनीय म्हणजे केवळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तीतील नावांची पट्टीच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील नावाच्या पाट्याही बदलण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये खाली दिलेल्या पुढील पोलीस कर्मचारी आणि अधाऱ्यांचा समावेश आहे: फौजदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक आणि अधीक्षक आदिंच्या दालनाबाहेर व टेबलावर असलेल्या नावांच्या पाट्याही बदलण्यात आल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *