महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला (Bjp) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन दिग्गज नगरसेवक शिवसेना ठाकरेंच्या (Shivsena Thackeray) गळाला लागण्याची शक्यता आहे. विकास म्हात्रे (Vikas Mhatre) हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या या दोन नगरसेकांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महापालिक निवडणूक लागण्याच्या अगोदर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या दोन नगरसेवकांनी जिल्हा अध्यक्षाकडे राजीनामा दिला आहे. सन्मानाची वागणूक मिळाली नाही, त्यामुळं त्यांनी भाजपाला राम राम ठोकला आहे. बाजूचे दोन वॉर्ड शिवसेना मनसे या वॉर्डमध्ये निधी दिला आहे. पण बीजेपीचे आम्ही नगरसेवक आहोत आम्हाला निधींपासून डावलले आहे. कोणताही मान मिळाला नाही पद वाटपात विचारात घेतले नाही, त्यामुळं राजीनामा दिल्याची माहिती नगरसेवकांनी दिली आहे. विधान सभेच्या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांना लिड दिले आहे तरीही नाराज आहेत याचे कारण मला समजले नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
जनसंपर्क कार्यालयावरील भाजपाचे बॅनर हटवले
उध्दव ठाकरे रविवारी डोंबिवलीत येणार आहेत. यावेळी विकास म्हात्रे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र ठाकरे गटात सन्मान मिळाला तर ठाकरे गटात जाणार असल्याची भूमिका ते घेणार आहेत. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावरील भाजपाचे बॅनर हटवले आहेत. त्यामुळं विकास म्हात्रे, कविता म्हात्रे हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान, सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.पुढच्या तीन महिन्यानंतर राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुुरुवात केली आहे. अनेक पक्षांनी बैठका, चर्चा सुरु केल्या आहेत. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर फडणवीस बोलत होते. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश आहेत. स्थानिक पातळीवर महायुती म्हणून चर्चेला सुरुवात करा असेही त्यांनी म्हटलं आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणून एकत्र लढण्याची तयारी सुरु करा असे मुख्यमंत्री म्हणालेत. गरज भाषेला तिथेच वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. अशी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजप कोअर कमिटीमध्ये करण्यात आली.