लेखणी बुलंद टीम:
अभिनेता किरण गायकवाडचे अलीकडेच लग्न झाले. त्याने 14 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. किरणची ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती, या मालिकेतील अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत किरणने लग्न केले. बऱ्याच काळापासून किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांनी नातं लपवून ठेवलं होतं. 29 नोव्हेंबरला किरण-वैष्णवीने प्रेम जाहीर केलं. किरण गायकवाडने सोशल मिडीयावर पोस्टकरत आपल्या नात्याची कबूली दिली होती. किरण यांनी आपल्या पोस्टमध्ये आपल्या लग्नाची तारीख देखील त्यावेळी जाहीर केली होती.
पाहा पोस्ट –
instagram.com/reel/DDjsxPSz7q0