लेखणी बुलंद टीम:
अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. सलमानने चिमुकल्या भाचीसोबत मिळून गणपतीची आरती केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
शनिवारी 7 सप्टेंबर रोजी घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये अत्यंत जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी सलमानसह त्याचं संपूर्ण कुटुंब अर्पिताच्या घरी गणपती बाप्पाच्या आरती आणि पूजेसाठी उपस्थित होतं. सलमानने भाजी आयातसह मिळून आरती केली. या आरतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणपती बाप्पाच्या आरतीला सलमानचे वडील सलीम खान, भाऊ अरबाज आणि सोहैल खानसुद्धा उपस्थित होते.
पापाराझी अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये अरबाज आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान, सोहैल खानची मुलं योहान आणि निर्वाण खानसुद्धा दिसत आहेत. याशिवाय वरुण शर्मा, ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरी आणि सलमानची कथित एक्स गर्लफ्रेंड लुलिया वंतूर पुजेला उपस्थित होते. कुटुंबीयांसोबत पूजा आणि आरती केल्यानंतर सलमान अंबानींच्या गणपती दर्शनाला पोहोचला होता.
सलमानच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मी धर्मनिरपेक्ष सलमान भाईचा चाहता असल्याचा मला अभिमान आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमान हा सर्वांत धरनिरपेक्ष भारतीय आहे’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे. दरवर्षी सलमानच्या घरी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि संपूर्ण खान कुटुंबीय बाप्पाची मनोभावे पूजाअर्चना करतात. हीच प्रथा खान कुटुंबाने यावर्षीही कायम ठेवली आहे.
सलमान लवकरच ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शत ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढच्या ईदला प्रदर्शित होमार आहे. नुकतेच सलमानने ‘सिकंदर’च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या चित्रपटात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच सलमान-रश्मिकाची जोडी मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C_n3ruHSB4k