कोरोनानंतर आता नवा आजार आला आहे. या आजारात रुग्ण नाचताना दिसतात. वाचून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. हा आजार भारतात नसून आफ्रिकेत आहे. आफ्रिकेतील काही भागात डिंगा डिंगा रोगाची प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्णाण झालं आहे. शरीरात जास्त थरथरल्यामुळे या आजाराचा रुग्ण खूप थरथरत राहतो, ज्यामुळे सीडीसीने या आजाराला डिंगा डिंगा म्हणजेच डान्सिंग डिसीज असे नाव दिले आहे.
आफ्रिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. किता ख्रिस्तोफर यांनी सांगितले की, सध्या या आजारावर अँटीबायोटिक्सद्वारे उपचार केले जात आहेत आणि अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. हा आजार कसा आला आणि का पसरत आहे, याची नेमकी माहिती आरोग्य विभागाला अद्याप मिळालेली नाही.
मात्र, सद्यस्थितीत रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून रुग्ण आठवडाभरात बरे होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, येथे 394 रुग्णांची नोंद झाली आहे.
डिंगा तापाची लक्षणे कोणती?
ताप डोकेदुखी खोकला नाक वाहणे अंगदुखी
‘हा’ आजार का पसरत आहे?
आफ्रिकेचा आरोग्य विभाग डिंगा, डिंगा रोगाचा प्रादुर्भाव कशामुळे झाला याचा शोध घेत आहे. इन्फ्लूएन्झा, कोविड-19, मलेरिया किंवा गोवर यांसारखे संसर्ग या आजाराला कारणीभूत आहेत का, याचा तपास केला जात आहे, परंतु डिंगाच्या प्रसाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या भागात हा आजार पसरत आहे, तेथील लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हा रोग संसर्गजन्य मानला जातो आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याची भीती आहे.
मंकीपॉक्सपाठोपाठ डिसीज एक्सची प्रकरणे
आफ्रिकेत गेल्या तीन महिन्यांत या आजाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मंकीपॉक्सपाठोपाठ एक्स या आजाराचेही रुग्ण येत असून अनेक रुग्णांचा यामुळे मृत्यूही झाला आहे. आता डिंगा, डिंगा या आजाराच्या आगमनानंतर धोका अधिकच वाढला आहे. या आजाराबाबत लोकांना सतर्कही केले जात आहे.