बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने गोरेगाव परिसरात वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेस्टची बस जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसची पुढे जाणाऱ्या ट्रक ला मागून धडक बसली. या धडकेमुळे बसमधील बसलेले पाच ते सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले.
अपघातात बसच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले.तर ट्रकच्या मागीलबाजूचे नुकसान झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे काही भाग तुटून रस्त्यावर पडले.अपघातात जखमींना उपचारासाठी जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी बस चालकाच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बसचालकाला ताब्यात घेतले आहे. सुदैवाने बस मध्ये कमी प्रवाशी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.