बीटचा रस ठरेल तुमच्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महिलांसाठी बीटचे अनेक फायदे आहेत. बीटचा रस नियमित प्यायल्यास शरीराला पोषण मिळतं आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. चला तर पाहूयात बीटचा रस महिलांसाठी कसा उपयुक्त आहे.रक्ताची कमतरता पूर्ण करतो : बीटमध्ये लोह (Iron) मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करतो. बीटरूटचा रस प्यायल्याने शरीराला लोह मिळते ज्यामुळे थकवा दूर होतो.

हार्मोन्स संतुलित ठेवतो : बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि महत्त्वाची पोषकतत्त्वं असतात. यामुळे स्त्रियांचा हार्मोनल बॅलेन्स राखला जातो. हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या त्वचेसंबंधी आणि मानसिक त्रासांपासून आराम मिळतो.

मासिक पाळीतील त्रास कमी करतो : बीटमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील वेदना कमी करतात. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. तसेच, पाळी नियमित राहण्यासाठी बीट उपयुक्त आहे.
उर्जा वाढवतो : बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात जे शरीरात जाऊन रक्तप्रवाह वाढवतात. ज्यामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि दिवसभर फ्रेश वाटतं.

हृदय निरोगी ठेवत : बीटमधील पोषकतत्त्व रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे बीटचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पचनसंस्था सुधारतो : बीटरूटमध्ये फायबर्सचे घटक भरपूर प्रमाणात असतात. हे घटक पचनक्रिया सुरळीत ठेवतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी बीट फायदेशीर आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *