23 तारखेला बारामतीकर दाखवून देतील;अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बारामतीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वेगळा आणि शरद पवारांचा वेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवारांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. पक्षफुटीनंतर दोन गट पडलेच पण त्यानंतर आता पाडवा देखील वेगळा घेण्यात आला. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, बारामतीकारांनी दादांवर खूप प्रेम केलं आहे. दादांनी बारामतीसाठी खूप काही केलं आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पहिल्यांदाच अशा पद्धतीने काटेवाडीमध्ये पाडवा साजरा करण्यात आला. मात्र, अजित दादांवर प्रेम करणारे लोकांनी प्रचंड गर्दी केली. दादांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली याचा आनंद आहे. बारामतीकारांनी दादांवर खूप प्रेम केलं आहे. दादांनी बारामतीसाठी खूप काही केला आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील.याच काटेवाडीच्या बंगल्यात पवारांची भाऊबीज साजरी होते. उद्या भाऊबीज आहे त्याच्यासाठी अजून नियोजन पूर्ण झालेला नाही असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. तर पवार कुटुंबियात फक्त राजकीय मतभेद आहेत. आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांना भेटतो शुभेच्छा देतो आणि पवार साहेबांना देखील शुभेच्छा देऊ. मात्र, आतापर्यंत आम्ही भेटलेलो नाही असंही त्या पुढे म्हणाल्यात.

‘काटेवाडीत आता दरवर्षी पाडवा साजरा होणार’ – पार्थ पवार
आता दरवर्षी दिवाळीचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. पहिल्यांदाच जरी बारामतीत पाडवा दोन ठिकाणी होत असला तरी काटेवाडीच्या पाडव्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे. राज्यभरातून लोक अजितदादांना भेटण्यासाठी आले आहेत याच्या वरूनच आपण अंदाज लावू शकता लोक कुणासोबत आहेत. याच्यापुढे दरवर्षी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जाणार अजित पवार हे काटेवाडीमध्येच दिवाळीचा पाडवा साजरा करणार असल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं आहे. तर अजित दादांची आणि शरद पवारांची विचारधारा ही वेगळी आहे म्हणून आता पक्ष वेगळं झालं आहे. निवडणूक आहे त्यामुळे भाऊबीज देखील आम्ही लोकांसोबतच साजरी करणार आहोत, लोकांमध्ये संभ्रम नको असंही पुढे पार्थ पवार म्हणालेत.

पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा
गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत पाडवा साजरा करत आलं आहे. दिवाळी पाडव्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते एकत्र येत, शुभेच्छा देत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *