मुंबईत ऑस्ट्रेलियन NRIची फसवणूक, 10 मिनिटांच्या प्रवासासाठी सांगितले 2800 रुपये भाडे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

ऑस्ट्रेलियातून आलेल्या NRI सोबत फसवणूक केल्याची विचित्र घटना मुंबईत घडली आहे. एका कॅब ड्रायव्हरने एनआरआयकडून 10 मिनिटांच्या प्रवासासाठी 2800 रुपये भाडे आकारले. कॅब चालकाने यासाठी टॅक्सी बुकिंग ॲपची मदत घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या आर्थिक राजधानीत ऑस्ट्रेलियातील एका अनिवासी भारतीय व्यावसायिकासोबत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई विमानतळावरील एका टॅक्सी चालकाने बनावट ॲपचा वापर करून विलेपार्ले येथे 10 मिनिटांच्या प्रवासासाठी 2800 रुपये आकारले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्याला फसवणूक झाल्याचे उघड झाले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली. 15 डिसेंबरच्या रात्री मुंबई विमानतळावर ऑस्ट्रेलियन एनआरआय व्यावसायिक रात्री कॅबच्या शोधात असताना ही घटना घडली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *