कानपूरमध्ये बांगलादेशी चाहत्यावर हल्ला, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs BAN 2nd Test 2024) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur, Green Park) खेळवला जात आहे. जिथे बांगलादेशी चाहत्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काही भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी तरुणाला मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हल्ल्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ढाका येथील टायगर रॉबी (Tiger Roby) नावाचा बांगलादेशी चाहता भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पाहण्यासाठी कानपूरला पोहोचला होता. यादरम्यान मैदानावरील भारतीय चाहत्यांशी बाचाबाची झाली. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी टायगर रॉबीला ढकलून ध्वज हिसकावला. रॉबीने याला विरोध केल्यावर भारतीय चाहत्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

प्रकरण चिघळत असल्याचे पाहून तेथे उपस्थित अन्य भारतीय चाहत्यांनी हस्तक्षेप केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस प्रेक्षक स्टँडवर पोहोचले. जिथे रॉबी वेदनेने ओरडताना दिसला. त्यानंतर रॉबीला रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

पहा पोस्ट:

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *