आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली. त्यामुळे दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी अनेकांची नावेही चर्चेत होती. मात्र, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमताने निवड केली. या निवडीनंतर अरविंद केजरीवाल यांनी (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. आता आज शनिवार (२१ सप्टेंबर) आतिशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. सध्याच्या आम आदमी पार्टीतील बहुसंख्य नेते हे त्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचदरम्यान, आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी घेतली शपथ
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा उपराज्यपालांच्या निवासस्थानी पार पडला. आतिशी या आपच्या आमदार आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *