शूटिंगवेळी सलमान खानकडून गळ्याला खरोखरच कापलं गेलं होतं, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठीमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. मराठीतील दिग्गज स्टार म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र, त्यांनी फक्त मराठीतच नाहीतर हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिकंली. दरम्यान विनोदी भूमिकांसोबत त्यांनी आपल्या कारकीर्दीत एक नकारात्मक भूमिका देखील केली होती. ही भूमिका 1992 साली आलेल्या सलमान खानच्या जागृती या चित्रपटात होती. मात्र, या चित्रपटातील एक सीन शूट करताना एक भीषण आणि खरंतर जीवघेणा प्रसंग घडला होता. याबाबतचा किस्सा अशोक सराफ यांनी Radio Nasha च्या पॉडकास्टमध्ये सांगितलाय. जागृती सिनेमात अभिनेता सलमान खान आणि करिश्मा कपूर देखील मुख्य भूमिकेत होते.

सलमान खानसोबत शूट करताना घडलेल्या प्रसंगाबाबत अशोक सराफ यांनी रेडिओ नशा या चॅनेलसोबत गप्पा मारताना उघडपणे सांगितलं. एका तणावपूर्ण सीनचं शूटिंग करताना प्रत्यक्षात खरा चाकू वापरला गेला होता आणि सलमान खानने त्यांच्या गळ्याला खूपच जोरात पकडलं होतं.

अशोक सराफ म्हणाले, “सलमान खान माझ्या गळ्यावर चाकू ठेवून उभा होता आणि तो चाकू खरा होता. त्याचा टोक धारदार होतं. त्यामुळे माझा गळा थोडास कापला गेला होता. डायलॉग्स सुरू होताच मी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला. सलमान जोरात दाबत होता, आणि मी लगेच सांगितलं – ‘थोडं हळू दाबा, इथं कापतंय.”

सराफ यांनी सुरक्षिततेसाठी चाकू कसा पकडावा यावर सूचना दिली, पण कॅमेरा अँगलमुळे ते शक्य नव्हतं. “तो म्हणाला, ‘मी काय करू?’ मी सांगितलं, ‘उलट पकड ना चाकू.’ तो म्हणाला, ‘कॅमेरा समोर आहे, दिसेल तसं.’ मग मी विचार केला, ‘राहू दे.’” सीन पूर्ण झाला, पण तोपर्यंत गळ्यावर खोल जखम झाली होती. “सीन पूर्ण केला आणि नंतर पाहिलं तर गळ्यावर खोल जखम झाली होती. जर गळ्यावरची नस थोडी कापल्या गेली असती तर तिथेच सगळं संपलं असतं. मी तो प्रसंग कधीच विसरणार नाही.” असंही अशोक सराफ यांनी स्पष्ट केलं.

जागृती चित्रपटात शिवा रिंदानी, पंकज धीर, आणि प्रेम चोप्रा यांच्याही भूमिका होत्या. या भयावह प्रसंगानंतरही अशोक सराफ यांनी सलमान खानसोबत करण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या, बंधन यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये पुन्हा एकत्र काम केलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *