जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला प्रथमच मिळाला सात दिवसांचा पॅरोल

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला प्रथमच सात दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. पॅरोल कालावधीत आसाराम यांना महाराष्ट्रातील माधवबागमध्ये उपचार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कालावधीत ते पोलिस कोठडीत राहणार आहे

 

आसारामने उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता, मात्र तो प्रत्येक वेळी फेटाळण्यात आला. यापूर्वी आसाराम यांना जोधपूर येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तेथे आसाराम यांनी पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले. आसारामने पॅरोल अर्ज दाखल केला होता, तो स्वीकारण्यात आला आणि उपचारासाठी 7 दिवसांच्या पॅरोलचे आदेश देण्यात आले.

85 वर्षीय आसाराम बापू 2013 पासून जोधपूर तुरुंगात बंद आहेत. आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती. आसारामने आपल्या आश्रमातच एका किशोरवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पाच वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *