बुलढाण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार, टक्कलनंतर आता दृष्टीदोष

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या काही गावांमध्ये नागरिकांमध्ये केस गळणे (Hair Loss), टक्कल पडणे (Baldness) अशा समस्या पाहायला मिळत होत्या. या समस्यांचे निदान करुन वैद्यकीय उपचार सुरु असतानाच आता नागरिकांमध्ये दृष्टीदोष (Buldhana Vision Impairment) वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगोदरच केसगळती आणि तत्सम समस्येने हैराण असलेल्या नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. धक्कादायक म्हणजे केसगळती उद्भवलेली गावे आणि नागरिकांमध्ये ही समस्या जोर धरु लागल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि राज्य सरकारनेही आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

समस्याग्रस्त गावांचे जसस्त्रोत प्रदूषीत
बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या शेगाव तालुक्यातील ज्या काही 12 ते 15 गावांमध्ये केस गळणे आणि पुढे डोक्याला संपूर्ण टक्कल पडणे असी समस्या उद्भवली आहे. त्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जसस्त्रोत प्रदूषीत असल्याचे पुढे आले आहे. या गावात जिल्हा आरोग्य विभाग आणि आयसीएमआर पथकांनी पाहणी केली आहे. दरम्यान, आलेल्या अहवालांतून पुढे आले आहे की, गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी आणि बोअरवेलमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. शिवाय पाण्यामध्ये क्षारही अधिक प्रमाणामध्येत. ज्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. हा परिणाम केसांशी निघडीत समस्यांमधून दिसतो आहे. दरम्यान, या नागरिकांवर वैद्यकीय उपचार सुरु असतानाच आता गावकऱ्यांमध्ये दृष्टीदोष आणि डोळ्यांशी निघडीत समस्या उद्भवल्या आहेत.

शेगाव तालुक्यातील गावकऱ्यांनी दावा केला आहे की, त्यांना आगोदर केसगळती आणि टक्कल पडणे अशा समस्या होत्या. आता वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्यात काहीसा सकारात्मक परिणाम होऊन तो त्रास कमी झाला आहे. मात्र, आता नवीच समस्या निर्माण झाली आहे. गावातील ज्या नागरिकांना या समस्या होत्या त्यांना आता दृष्टीदोष निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांची नजर अधू झाली आहे. त्यामुळे केसांचे काहीतरी होईल. पण डोळ्यांचा विकार झाला आणि जर का नजरदोष निर्माण झाला तर मात्र गावाकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रशासनाने आताच काहीतरी करावे, अशी मागणी हे नागरिक करत आहेत.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या आरोग्य विषयक समस्यांबाबत आरोग्य विभागाला अद्यापही ठोस असा निष्कर्ष काढता आला नाही. आरोग्य विभाग अद्यापही हे नेमके का होत असावे याबाबत अभ्यास करत आहे. त्यामुळे एका समस्येवर अभ्यास सुरु असतानाच शेगाव तालुक्यात नवी समस्या उद्भवली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *