रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका वृध्द व्यक्तीला कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण, पहा व्हिडीओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

उपचारासाठी आलेल्या एका वृध्द व्यक्तीशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचे संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वृध्द व्यक्तीला एका कर्मचाऱ्याने चापट मारली, ऐवढेच नव्हे तर त्यांना धक्काबुक्की करत रुग्णालयातून बाहेर काढले, ही घटना एकाने फोनमध्ये कैद केली. हे सर्व सुरु असताना इतर कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी फक्त बघ्याची भुमिका घेतली.

मिळलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथील आहे. वयोवृध्द व्यक्ती गुलाब खान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे ते काही दिवसांपासून सतत जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी आराम न मिळाल्यामुळे ते काल पुन्हा आले. त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, दिलेल्या औषधांनी आराम मिळत नसल्याने त्यांनी औषध बदलून द्या असे सांगितले. इमर्जन्सीमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपता व्यक्त करत गुलाब यांना मारहाण केली.

कर्मचाऱ्याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना रुग्णालयातून बाहेर काढले. उपस्थित लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार अशी माहिती दिली. या प्रकरणी चौकशी समिती बसण्यात येणार आहे. दोषींवर कारवाई केली जाणार अशी देखील माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

पहा व्हिडीओ:

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *