लेखणी बुलंद टीम:
केरळच्या कोची येथे 25ऑगस्ट रोजी आलिशान कारचा अपघात झाला. या अपघातात दोन मर्सडिजचा समावेश होतो. चाचणी ड्रायव्हदरम्यान त्यांची धडक झाल्याचे हा अपघात घडला. या अपघातात मर्सिडीज-बेंझ एएमजी जीटी 63 एसई परफॉर्मन्स आणि मर्सिडीज-बेंझ एएमजी एसएल 55 रोडस्टरचा समावेश होता. अपघातात दोन्ही कारचे भरपूर नुकसान झाले आहेत. दोन्ही कारची धडक वर झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, GT 63 SE ही कार जवळच असलेल्या रेल्वे फाटकाच्या दिशेने येत होती त्यावेळीस कारचे नियंत्रण सुटले आणि ही कार दुसऱ्या एका वाहनाला धडकली. अधिक नुकसान टाळण्यासाठी कार उजवीकडे वळवण्यात आली परंतु त्याचवेळीस विरुध्द दिशेने येणाऱ्या SL55 रोडस्टवर दोन्ही कार समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कारचे समोरील भागाचे नुकसान झाले. रस्त्यावर काचा फुटल्या होत्या.
अपघातात दोन्ही चालक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अपघाताचे नेमके कारण शोधत आहे.