मकर संक्रांती दिवशी ‘या’ जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूल बंद राहणार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागपूर पोलिस विविध प्रयत्न करत आहे. पतंग उडवणारे नायलॉन मांजा वापरू नयेत यासाठी, पोलिस आता छतावर जाऊन त्यांची तपासणी करत आहे.

उंच इमारतींमधून पतंग उडवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. प्राणघातक दोरीमुळे चालकांना दुखापत होऊ नये म्हणून वाहनांना तारा बांधल्या जात आहे. नागपूर पोलिसांनी संक्रांतीच्या दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील सर्व उड्डाणपुलांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. यामध्ये शाहिद गोवारी, सक्करदरा, मेहंदीबाग, पाचपावली, दिघोरी, कढबी चौक-सदर, मानकापूर, दही बाजार, मनीषनगर, वाडी, पारडी आणि कावरापेठ पूल यांचा समावेश आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *