पुण्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा,पुढील 24 तासाकरिता पुणे..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अशामध्ये सखल भागात राहणार्‍या आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी सध्या जलसंपदा विभाग सोबत समन्वय साधून असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासाकरिता पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

प्रचंड पावसामुळे खडकवासला धरणातून 2000 क्युसेक इतका विसर्ग अर्ध्या तासापासून सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अशा सर्व यंत्रणांशी जलसंपदा विभाग यासाठी समन्वय ठेवून आहेत. स्थानिक प्रशासन सुद्धा योग्य खबरदारी घेत आहेत.

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *