हवाई दलातील जवानाने कर्तव्यावर असतानाच स्वत:च्या अधिकृत शस्त्राने गोळी झाडून केली आत्महत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

हवाई दलातील एका जवानाने कर्तव्यावर असताना स्वत:च्या अधिकृत शस्त्राने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हरियाणातील भिवानी येथील जयवीर सिंग 36 याने मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या अधिकृत शस्त्राने गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून एअरफोर्स नगर येथील मेंटेनन्स कमांड सेंटरमध्ये उपस्थित असलेले सहकारी जवान सावध झाले आणि त्यांना सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सिंगच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून तो तणावात दिसत होता. आत्महत्येचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. पुढील तपासासाठी हे प्रकरण नागरी पोलिसांकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वायुसेना प्रशासन मृतांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करत आहे.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *