तब्बल नऊ वर्षानंतर नवीन बसेसची महामंडळाकडून खरेदी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

गाव तेथे एसटी असे घोषवाक्य असलेली लालपरी गावागावात धावत असते. राज्यभरातील प्रवाशांसाठी लालपरी प्रवासाचे सर्वात महत्वाचे साधन आहे. गेली अनेक वर्ष एसटीच्या ताफ्यात नवीन बसेसचा समावेश केला गेला नव्हता. परंतु आता राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार नवीन बसेसची खरेदी केली आहे. आषाढी वारीत भाविकांना या नवीन बसेसमधून प्रवास करता येणार आहे. राज्यभरातून वारीसाठी दोन हजार बस धावणार आहेत. यामुळे वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन लालपरी दाखल होत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना नवीन लालपरीचा सुखद प्रवास अनुभवता येणार आहे.

२०१६ नंतर बसेसची खरेदी
काही वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. मात्र, २०१६ नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून जुन्या बसनेच आषाढी वारी, दिवाळी यांचा प्रवास सुरू होता. गेल्या काही वर्षांत आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवासाचा सुखद अनुभव येत नव्हता. मागील वर्षी पुणे विभागातून आषाढी वारीसाठी पुण्यातून पंढरपूरसाठी ३८० बस सोडण्यात आल्या. या सर्व बस जुन्या होत्या. परंतु आता नवीन बसेसची खरेदी झाली आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखद होणार आहे.

यंदा राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाल्या आहेत. पुढील महिन्याभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आतापर्यंत दीड हजार बस दाखल झाल्या आहेत. तसेच पुढील एक महिन्यात आणखी एक हजार बसेस येणार आहे.

नवीन बसेसमध्ये अनेक सुविधा
एसटी महामंडळाने तीन हजार नवीन बसेस घेतल्या आहे. या बसेस अत्याधुनिक आहेत. यामध्ये अनेक सुविधांचा समावेश केला आहे. तीन बाय दोन या पद्धतीने या बसेसची बांधणी करण्यात आली आहे. या बसमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन, कॅमेरे, चार्जिंग पोर्ट्स दिले आहे. तसेच बसमध्ये काही बिघाड झाला तर ते शोधण्यासाठी संगणक प्रणाली आहे. या बसेस चेसिसवर न बांधता आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *