मुंबईनंतर आता अमरावती येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. अमरावती शहरातील मंगलधाम कॉलनीतील एका ५४ वर्षीय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. हे गंभीर संकेत असूनही, शहरातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन गाढ झोपेत आहे. स्वॅब घेण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. चाचणीसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध नाही, ज्यामुळे संशयित रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या निष्काळजीपणामुळे अमरावतीतील लोकांना पुन्हा एकदा कोरोना संकटात टाकता येते.

मंगलधाम कॉलनीतील रहिवासी असलेल्या ५४ वर्षीय महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे ही महिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. तसेच, अमरावती विद्यापीठाची प्रयोगशाळेची टीम महिलेचा स्वॅब घेण्यासाठी पोहोचली. या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या महिलेला अद्याप रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या महिलेवर उपचार सुरू आहे याची माहिती समोर आलेली नाही. तसेच, यामुळे अमरावती शहरात आणखी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *