मालदीवसाठी अभिनेत्री कतरिना कैफची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून निवड

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सोशल मीडियावर मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, अभिनेत्री कतरिना कैफची मालदीवसाठी जागतिक पर्यटन(Maldive Tourism) राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी/ व्हिजिट मालदीव) ने घोषणा केली की भारतीय चित्रपट उद्योगातील एक प्रमुख चेहरा असलेली अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) मालदीवसाठी जागतिक ब्रँड राजदूत म्हणून निवडण्यात आले आहे. जानेवारी 2024 मध्ये भारत-मालदीव संबंध बिघडले होते. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांतील सलोख्यात बदल झाला आहे. मालदीवला भेट देण्यासाठी आणि अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कतरिना कैफची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या मालदीव भेटीपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. लवकरच पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौरा करणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *