अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याती प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहे. या सैफ अली खान याची पत्नी , अभिनेत्री करीना कपूर खान तसेच त्यांची मुलं सुरक्षित आहे. हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोर घरात घुसला आणि त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. नंतर तो फरार झाला. सध्या पोलिस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत.