एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांवर कारवाई; गांजा, कोकेन. दोन मुली,काय साडपलं?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

शहरातील रेव्ह पार्टीमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नेमकी काय कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये काय साडपलं याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. पोलिसांनी या ठिकाणाहून कोकेन, गांजा, हुक्का पॉट आणि फ्लेवर, दारू आणि बीयरच्या बाटल्यांसह इतर काही साहित्य जप्त केलं आहे. तसेच पकडण्यात आलेल्या सात जणांवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास सुमारास पुण्यातील खराडी भागातील स्टेबर्ड अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपींकडून 41 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) (11) अ, 21 (ब), 27 कोटपा 7 (2), 20 2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल पिंगळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) यांनी या कारवाईची माहिती दिली.

पोलिसांनी काय साहित्य जप्त केलं?
2.7 ग्रॅम कोकेन
70 ग्रॅम गांजा
हुक्का पॉट आणि फ्लेवर
दारू आणि बीयरच्या बाटल्या
दहा मोबाईल
दोन चार चाकी गाड्या
41 लाख रुपये
अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे
प्रांजल मनिष खेवलकर(41)
निखिल जेठानंद पोपटाणी (35)
समीर फकीर महमंद सय्यद (41)
सचिन सोनाजी भोंबे (42)
श्रीपाद मोहन यादव (27)
ईशा देवज्योत सिंग (22)
प्राची गोपाल शर्मा (22)
पोलिस उपायुक्त म्हणाले की, “पुढील तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने इतर बाबी या तपासाअंती समोर येतील. आरोपींचे मेडिकल केलं आहे, त्याच्या काही बाबी समोर येतील. या पार्टीमध्ये अजून कुणी येणार होतं का याचा तपास सुरू आहे. कुठलीही गोष्ट अधांतरी समोर येणार नाही. सर्व गोष्टी या तपासाअंती समोर येतील.”

राज्यात एकीकडे हनी ट्रॅपवरून राज्यात वादंग सुरू आहेत, त्यात आता रेव्ह पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालं. पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव्ह पार्टीवरील कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.

उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खराडीत एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीत 5 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश होता. पार्टीत अंमली पदार्थ, दारू, हुक्का यांचं सेवन सुरू होतं. हाउस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती.

या ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. खराडी पोलीस ठाण्यात या सर्व 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेत. पुणे पोलिसांकडून सातही जणांची चौकशी सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *