लेखणी बुलंद टीम:
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील उईके यांनी गेल्या महिन्यात ३०० विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्याच्या धमकीमुळे अनेक विमानांना उशीर झाला आणि अनेकांना रद्द करावे लागले. मात्र, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्याच्या उद्देशाने हे सर्व कृत्य केल्याचा युक्तिवाद जगदीशने केला आहे. यामागे दुसरा कोणताही हेतू त्याचा नाही.
35 वर्षीय जगदीश हे लेखक आहे. त्यांनी एक पुस्तक देखील लिहिले आहे. पोलीस पुढील चौकशी करत असून जगदीशला ओळखणारे लोक सांगतात की उईके यांची मानसिक स्थिती बरी नाही.