चक्क बिर्याणीच्या प्रेमात पडलेल्या महिलेने आपल्या मुलांना संपवले. अबीरामी प्रेमात पडली आणि तिच्या दोन लाडक्या मुलांची हत्या केली. 2018 चे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेचा विषय बनले आहे. न्यायालयाने अबीरामी आणि तिचा प्रियकर मीनातची सुंदरमला शिक्षा सुनावून त्या मुलांना न्याय दिला आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. तामिळनाडूतील कांचीपुरम येथील रहिवासी असलेल्या अबीरामीला दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी होती.
विशेष म्हणजे पती आणि दोन मुलांसह तिचे जीवन चांगले सुरू होते आणि पती एका नामांकित बँकेत काम करत होता. यादरम्यान तिला टिक टॉकवर व्हिडीओ बनवण्याची सवय लागली. टिक टॉकवर व्हिडीओ बनवण्यासोबतच तिला दुसरा एक छंद लागला होता, तो म्हणजे दररोज बिर्याणी खाणे. त्यांच्या घराजवळ एक फेमस बिर्याणी स्टॉल होता आणि तिथूनच ती दररोज बिर्याणी मागवत होती.
जिथून अबीरामी दररोज बिर्याणी मागवत होती, तिथे एक मुलगा काम करत होता आणि त्याचे नाव मीनातची सुंदरमला. अबीरामीच्या घरी तोच बिर्याणीची डिलीवरी देण्यासाठी येत दोघांमधील संवाद वाढला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मीनातचीच्या प्रेमात पडल्यावर ती विसरली की, आपले अगोदरच लग्न झाले असून दोन गोंडस मुलेही आपल्याला आहेत.
अबीरामीच्या पतीला तिच्या अफेअरबद्दल कळाले, यामुळे तिला प्रियकराला भेटणे कठीण झाले. कुटुंबियांनी तिच्यावर हे प्रेमप्रकरण बंद करण्यासाठी दबाव टाकला. यानंतर तिने ठरवले की, पती विजय आणि दोन्ही मुलांना रस्त्यातून काढून टाकायचे. यादरम्यान तिने दुधामध्ये विष टाकले आणि पतीसह दोन्ही मुलांना दिले. मात्र, तिचा मुलगा आणि पती यादरम्यान वाचला.
दूध पिल्याने मुलीचा मूत्यू झाला. यादरम्यान पती ऑफिसला गेला आणि मुलाचा मूत्यू झाला नसल्याने तिने उशीच्या मदतीने त्याचा जीव घेता. पती ऑफिसमधून घरी येण्याच्या अगोदर तिने प्रियकरासोबत मिळून पळ काढला. पती ज्यावेळी घरी पोहोचला तर त्याला त्याच्या दोन्ही मुलांचे मृतदेह घरात दिसले. आता कोर्टाने का केसमध्ये मोठा निर्णय देत शिक्षा सुनावली आहे.