आताच्या धकाधकाच्या जीवनात अनेक समस्या डोकंवर काढत आहेत. त्यामुळे जीवन धकाधकीचं जरी असलं तरी, काही उपाय असे आहेत, ज्यामुळे आपण काम आणि आरोग्या यामध्ये समतोल राखू शकतो. शरीरासाठी व्यायम जितका गरजेचा आहे, तितकाच आहार देखील… त्यामुळे आपण कायम डॉक्टरांचा सल्ला घेतो. कार्डियोलॉजिस्ट आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर चोप्रा कायम लोकांना आरोग्याबद्दल सांगत असतात. आता देखील त्यांनी अशी एक भाजी सांगितली आहे, जी अनेक समस्यांवर लाभदायक आहे. एक अशी भाजी जी बाजारात सहज मिळते. पण अनेकांना आवडत नाही. पण त्या भाजीमध्ये शरीरास मिळणारे अनेक फायदे आहे. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ती भाजी नक्की कोणती भाजी आहे. तर त्या भाजीचं नाव आहे भेंडी… ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल… पण रात्रभर भेंडी पाण्यात भिजवल्यानंतर अनेक फायदे होतात.
काय आहे भेंडीचे फायदे?
भेंडी खाल्ल्यांमुळे रक्तदाब (BP) नियंत्रणात राहतं. तर टाईप 2 डायबिटीजसाठी देखील भेंडी अत्यंत लाभदायक आहे. भेंडीमुळे पचनक्रिया देखील उत्तम राहते… शारीर हायड्रेट राहतं आणि मेटाबॉलिजम देखील उत्तम राहतं… भेंडीमध्ये फायबर असल्यामुळे वजन नियंत्रित राहतं… एवढंच नाहीतर हृदय विकारासाठी देखील भेंडी योग्य आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी कसं करावं भेंडीचं सेवन
मधुमेह व्यवस्थापनाबद्दल बोलताना, अभ्यासातून असं दिसून आलं आहे की 8 आठवडे दर सहा तासांनी 1000 मॅकग्रॅम भेंडी खाल्ल्याने HbA1c व्यवस्थापित करण्यात आणि साखर कमी करण्यात खूप मदत होते.
भेंडीचं पाणी
भेंडीची भाजी आवडत नसेल तर, एका वेगळ्या पद्धतीने देखील तुम्ही भेंडी तुमच्या आहारात सामिर करु शकता… भेंडीचं पाणी तुम्ही पिऊ शकता… तीन – चार भेंडी घ्या आणि स्वच्छ पाण्यात भेंडी धुवून घ्या… भेंडीचे छोटे – छोटे तुकडे करा आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, त्यानंतर सकाळी रिकाम्यापोटी भेंडीचं पाणी प्या… आरोग्यास अनेक फायदे होतील…
मेटाबॉलिजमसाठी काय म्हणाले डॉक्टर चोप्रा?
डॉक्टर चोप्रा यांनी सांगितल्यानुसार, तणाव, लाईफस्टाइल आणि झोप या कारणांमुळे मेटाबॉलिजमवर परिणाम होतो. अशात जर तुम्ही खूप पाणी पित असाल, प्रोटीन घेत असाल तर मेटाबॉलिजममध्ये फरक पडेल… मेटाबॉलिजम ठिक झाल्यास तुम्हाला उत्साही आणि प्रसन्न वाटेल… एवढंच नाही तर, अनेक आजारांपासून देखील सुटका होईल…
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)