राजस्थान येथील जयपूर शहरातील जवाहर नगर परिसरात बांधकाम सुरु असलेली एक दुमजली इमारत कोसळली. ही घटना गुरुवार २९ ऑगस्ट रोजी घडली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ढिगाऱ्याखाली अनेक वाहने, एक ज्यूसचे दुकान आणि आणखी एक दुकान अडकले. घटनेची तात्काळ माहिती बचावकार्याला देण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि नागरी संरक्षण पथक तातडीने दाखल झाले. बचाव कार्य सुरु झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत ढिगारा हटवण्याचे प्रयत्न चालू होते. पुढील तपसीलांची प्रतिक्षा आहे.