नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून वळवाच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच, अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही ठिकाणी नागरिकांनाही आपला जीव गमावाला लागला आहे. आता, नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका शिक्षकाचा (Teacher) वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या दुचाकीवरच वीज कोसळल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला. मात्र, वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटाने परिसरात हादरुन गेला होता. या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीवरुन जात होते. दुर्दैवाने त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होत आहे. मात्र, तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेने किंवा पोलिसांनी केला नाही. दरम्यान, पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याची देखील चर्चा गावपरिसरात होत आहे.

नांदेडमध्ये विद्यार्थ्याने संपवलं जीवन
नांदेडमधील नर्सिंग कॉलेजच्या 22 वर्षीय विद्यार्थ्यांने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटनाघडली. महाविद्यालतील दोन शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक आणि विद्यार्थ्यांनी केलाय. 22 वर्षीय पूनित वाटकर याने 12 मे रोजी नदीत उडी घेतली, आज त्याचा मृतदेह आढळला. मयत पुनीत वाटकर हा मूळचा अमरावतीचा रहिवाशी आहे. तो आणि त्याची बहीण नांदेड लोटस कॅम्पस मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकायला होते. वेगवेगळ्या विषयातील प्रात्यक्षिक (असाइनमेंट) सादर केल्याशिवाय परिक्षा फार्म भरत नाही, असं शिक्षकांनी सांगितलं. वेळ कमी असल्याने सर्वच विद्यार्थी मानसिक तणावात होते. त्यातूनच पुनीत वाटकर याने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. तसेच, संबधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यावर धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सूरू केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *