भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक; भाऊ आणि बहिणीचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील नारायण नागला रोडवर एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली.

या भीषण अपघातात मोटारसायकल चालवणारा भाऊ आणि बहीण जागीच ठार झाले, तर त्यांचा चुलत भाऊ जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली असून मोटारसायकलस्वार असलेले परीक्षा देण्यासाठी जात होते, असे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तपास सुरु आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *