लेखणी बुलंद टीम:
लातूर मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील एका शिपायाला 50 हजार रूपयांची लाच घेताना रंगे हात पकडले. या शिपायाला अटक करण्यात आले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, शासनाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून अंगणवाडी मदतनीससाठी रिक्त पदे काढण्यात आली होती. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी नियुक्तीचा अर्ज भरला पदाचा निकाल जाहीर झाला असून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले.
अंगणवाडीच्या पदावर नियुक्ती करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराला 1 ऑक्टोबर रोजी फोन केला आणि तुझी नियुक्ती या पदासाठी होईल असे सांगितले.