लेखणी बुलंद टीम :
7 ऑगस्ट रोजी वसंत कुंज येथील कथीत पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार सेवानिवृत्त व्यावसायिक आहे.
सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने तक्रारदारावर आरोप केला की, सीमाशुल्क विभागाने दिल्ली पोलिसांना तक्रारदाराने सिंगापूरला पाठवलेल्या पार्सलबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये 16 पासपोर्ट, 58 एटीएम कार्ड आणि 140 ग्रॅम ड्रग्ज होते. अचानक झालेल्या आरोपामुळे तक्रारदार गोंधळून गेला. दरम्यान, घोटाळेबाजाने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि त्याला बनावट पोलिस ओळखपत्र दाखवत आपण खरोखरच अधिकारी असल्याचेही सांगितले. दबाव टाकून त्याने तक्रारदाराचा विश्वास संपादन करत तक्रारदारावर मानवी तस्करीचा आरोप केला. परिस्थिती अधिक गंभीर दिसण्यासाठी, घोटाळेबाजाने अटक वॉरंट आणि मालमत्ता जप्तीच्या न्यायालयीन आदेशासह बनावट कागदपत्रेही त्याला पाठवली.
डिजिटल अटक आणि फसवणूक
दरम्यान, आपली चौकशी सुरु आहे. त्यामुळे खोलीतून बाहेर पडू नका असा दबाव टाकत आरोपींनी तक्रारदारास डिजिटल अटक केली. धक्कादायक म्हणजे त्यांना कोणाशीही संपर्क साधू दिला नाही. पुढील कारवाई टाळण्यासाठी 85 लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते करण्यासही तक्रारदारास सांगण्यात आले. जे त्याने केले. आणखी विश्वास संपादन करण्यासाठी कारावाई आणि चौकशीमध्ये तुम्ही निर्दोश आढळल्यास तुमचे सर्व पैसे 48 तासाच्या आतमध्ये परत केले जातील, असे आश्वासनही देण्यात आले. दरम्यान, दुस-याच दिवशी, कोणतीही अपडेट्स न मिळाल्यानंतर, तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.