कोल्हापूर जिल्ह्यात गाडी चालवताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कोल्हापुरात गाडी चालवताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि गाडी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि गाडीचा अपघात झाला. या अपघातात धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू झाला.बीएसएनएल टॉवरपासून टाकळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाजवळ हा भीषण अपघात झाला. धीरज यांना गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आला आणि गाडी नियंत्रणाच्या बाहेर गेली. आणि अनेक वाहनांना धडकली. या अपघातात धीरज यांचा मृत्यू झाला.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, धीरज पाटील यांना गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. धडक एवढी जोरदार होती की, अनेक वाहनांचे नुकसान झाले. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या मध्ये एक वेगाने येणारी कार अनेक वाहनांना धडकते. या अपघातात अनेक लोक थोडक्यात बचावले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. धीरज यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने आल्याचे अहवालात सांगितले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *