लेखणी बुलंद टीम:
मुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी 1846 जागांसाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मात्र या जाहिराती मध्ये दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं ही एक जाचक अट होती. या अटीबद्दल आक्षेप नोंदवल्या नंतर अखेर बीएमसी ने ती मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. आता या नोकरभरतीसाठी नव्याने जाहिरात निघणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. बीएमसीच्या जारी परिपत्रकामध्ये सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याची आणि सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील असे सांगण्यात आले आहे.
कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी बीएमसीच्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. केवळ ऑनलाईन माध्यमातून ही अर्ज प्रक्रिया सुरू असून अटींची पूर्तता न केलेल्यांचा अर्ज स्वीकरला जात नव्हता. त्यामुळे आता दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यामध्ये सूट देऊन पुन्हा नव्याने अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या अटीला रद्द करण्यासाठी बीएमसी मध्ये पालिका आयुक्तांना याबाबतचे पत्र देखील दिले होते. आदित्य ठाकरेंसोबतच अन्य स्तरामधूनही याबद्दल आक्षेप नोंदवला होता. अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
बीएमसीच्या या नोकरभरतीची प्रक्रिया 20 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार असून त्यानंतर उमेदवारांंची निवड होणार आहे. www.mcgm.gov.in वर अर्ज करता येणार असून 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती पण आता या अटी मध्ये बदल झाल्याने अर्ज करण्याची मुदत अजून वाढवली जाणार आहे. लवकरच त्याची सूचना देखील बीएमसी कडून केली जाईल.
बीएमसीच्या नोकरप्रक्रियेमध्ये SC, ST, OBC, EWS,आणि अन्य प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये वतोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. खुला वर्ग साठी वयोमर्यादा 18-34 वर्ष आहे तर आरक्षित वर्गासाठी 18-43 वर्ष आहे.
पहा बीएमसीची जाहिरात:
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द
सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार
सध्या अर्ज केलेल्या… pic.twitter.com/haM0tOXyqR
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 10, 2024