मोठा आवाज, टायर फुटला अन् शिवशाहीने पेट घेतला, संपूर्ण बस जळून खाक

Spread the love

Beed Shivshahi Bus Got Fire: परळीतील छत्रपती शिवाजी महाजार चौकात शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. बसचे टायर फुटून बसला ही आग

बीड: बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. लातूरहून परभणीकडे जाणारी ही बस परळी शहरात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली आणि यावेळी बसचे टायर फुटले आणि बसला भीषण आग लागली. या एसटीमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच पुढील अनर्थ टळला आहे.

लातूरहून परळीकडे निघालेल्या शिवशाही बसने परळीपर्यंतचा प्रवास हा आरामात केला. मात्र, परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात काहीतरी वाजल्याचा आवाज मोठा झाला. मात्र, यावेळेस या शिवशाहीच्या चालकाला आपल्याच गाडीच्या टायरचा हा आवाज असल्याचं जाणवलं. यावेळेस तात्काळ त्यांनी गाडी साईडला करत गाडीचा अंदाज घेतला, त्यावेळेस गाडीचा टायर फुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या गाडीच्या टायरने पेट घेतला. मात्र, गाडीने पेट घेताच काही क्षणात पेट वाढत चालल्याने चालकाच्या समय सूचकतेमुळे या गाडीतील प्रवासी हे सुखरूप बाहेर पडले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *