दिल्ली पोलिस रूप नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री रूप नगर पोलिस स्टेशनच्या एसएचओच्या फेअरवेल पार्टीदरम्यान हे कॉन्स्टेबल नाचत होते व नाचत असतांना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते तिथेच ते कोसळले. तसेच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच त्यांच्या मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे कॉन्स्टेबल 2010 मध्ये दिल्ली पोलिसात रुजू झाले होते.