“23 तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनणार”- अमित शाह

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

“सर्व देवस्थानांना मी प्रणाम करतो. जिंतूरवासियांना सांगायला आलोय. महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहायचा आहे का? 23 तारखेला आघाडीचा सुफडा साफ होणार आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनणार आहे”, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.

अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सांगायला आलोय. आघाडी सरकारने काय केलं याची लिस्ट घेऊन या. जिंतूरकरांनो दहा वर्षांपर्यंत शरद पवार केंद्रात मंत्री होते, सोनिया -मनमोहन यांचं सरकार होतं. 10 वर्षात महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार करोड रुपये मिळाले. मोदीजींनी 14 ते 24 मध्ये एक लाख 91 हजार करोडच्या समोर दहा लाख पंधरा हजार कोटी रुपये विकास निधी दिला.

25 लाख रोजगार देणार आहोत. 45 हजार गावांमध्ये पक्के रस्ते बनवणार आहोत. वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून करणार आहोत. 20 टक्के वीजेची बचत करणार आहोत. 50 लाख लख पती दीदी करणार आहोत. शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले ते ऐतिहासिक आहेत. किल्ल्यांसाठी आम्ही एक प्राधिकरण करून 2000 कोटी रुपये खर्च करणार आहोत. आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार याची गॅरंटी मी देतो. म्ही वक्फ जमिनी संदर्भात बिल आणलं तर शरद पवार,उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे,आदित्य ठाकरे,राहुल बाबा यांनी विरोध केला, असंही अमित शाहांनी सांगितलं.

पुढे बोलताना शाहा म्हणाले, जेवढा विरोध करायचा तेवढा करा. आम्ही डंके की चोट पे वक्फ बोर्डाचा कायदा मंजूर करून घेणार आहोत. सोनिया यांनी वीस वेळेला राहुल नावाचा प्लेन इलेक्शनमध्ये लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीत तुमचा राहुल नावाचं प्लेन हे क्रश होणारे लक्षात ठेवा. हरियाणातही यांनी प्रयत्न केला मात्र तिथेही आमचं सरकार आलं महाराष्ट्रातही महायुतीचा सरकार येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की अशाच गोष्टी सांगा ज्या तुम्ही करू शकतात. आमचे मोदी हे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकणारे नेते आहेत. लाडक्या बहिणीची योजना आणली महायुती सरकारने त्या योजनेलाही सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे विरोध करत आहेत, असा दावाही शाहांनी केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *