बंदूक दाखवून एका टोळीने पादचाऱ्यांना लुटले,पहा व्हिडीओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दिल्लीतील उस्मानपूर भागात लोकांना लुटताना एक टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर सात ते आठ जण बंदूक हातात घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना थांबवून त्यांचे सामान लुटत आहे. बंदूकीचा धाक दाखवत चोरट्यांनी अनेकांंकडून सामान लुटले.

ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. एकाने यावर प्रतिक्रिया दिली की, चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलाच नाही. चोरट्यांनी स्थानिकांकडून बॅग, दागिने आणि पर्स चोरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणी एकाने पोलिसांनी या प्रकरणी दखल घ्यावी अशी विनंती केली आहे.

पहा व्हिडीओ:


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *