‘हाऊस अरेस्ट’ शो विरोधात आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, शोवर बंदी घालण्याची मागणी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

उल्लू अॅपवरील (Ullu app) ‘हाऊस अरेस्ट’ (house arrest) या शो वरुन नवा वाद (House Arrest Controversy) सुरू असून, या शोवर बंदी घालावी, या मागणीने जोर धरलाय. अशातच आता या शो विरोधात आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शो मधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परिणामी या प्रकरणात बजरंग दलाकडून अंधेरी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच तक्रारीच्या अनुषंगाने उल्लू वरच्या कलाकार एजाज खान सोबत उल्लू अँपचा एमडी अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्यामुळे अभिनेता एजाज खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

…अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!- चित्रा वाघ
दुसरीकडे, उल्लू अ‍ॅपवरील कंटेटवर विरोधात भाजपच्या विधानपरिषदेच्या नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आक्षेप नोंदवत कडाडून विरोध केला आहे. राज्यातील दोन्ही महिला नेत्यांनी उल्लू या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही मागणी केली आहे.

दरम्यान, महिला नेत्या आक्रमक झाल्यानंतर उल्लू अॅपने मोठा निर्णय घेतलाय. उल्लू अ‍ॅपने ‘हाऊस अरेस्ट’ या रिअ‍ॅपलिटी शोचा वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. सोबतच एजाज खान हा शो होस्ट करत आहे. अलीकडेच, या रिअ‍ॅपलिटी शोच्या एका भागात, स्पर्धक मुलींना त्यांचे कपडे काढण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना असे काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते ज्यावर देशभरातून या शो वर सतत टीका होत होती आणि शोवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. अशातच आता या प्रकरणी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच तक्रारीच्या अनुषंगाने उल्लू वरच्या कलाकार एजाज खान सोबत उल्लू अँपचा एमडी अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *