लेखणी बुलंद टीम:
मुंबईत एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्त मधुकर संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. एअर होस्टेसचा अपमानास्पद वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर मांटुगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली. दोघांमध्ये जोरजोरात वाद झाला होता ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दादर येथील रहिवासी आहे. तीनं मांटुगा पोलिसांकडे या घटनेची तक्रा नोंदवली. तक्रारदार महिला मांटुगा येथील इमारतीत राहत आहे. जेथे मधुकर संखे हे इमारतीचे सचिव म्हणून काम करतात. महिनाभरापासून या इमारतीला कलरिंगचे काम सुरू असून, यादरम्यान तक्रारदाराने संखे यांना पार्किंगच्या ठिकाणी अडथळा ठरणारा फलक काढण्याची वारंवार विनंती केली. तिच्या तक्रारी असूनही, या समस्येकडे त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले.