लेखणी बुलंद टीम:
आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून आज येवल्यामध्ये देखील त्यांची सभा पार पडली. त्याच वेळेस त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने मागून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. कारला मागून धडक दिल्याने कारची काच फुटली आणि दुचाकीस्वार जखमी झाला. मनमाड शहरात जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.
राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अखेर यावर एमपीएससी आयोगाने निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकल्याणात आली आहे. या पेपरची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यात स्पर्धा परीक्षांचा हा घोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? बेसिक प्लॅनिंग एमपीएससीने करावं. अन्यथा एमपीएससी आयोगवाल्यांनी राजीनामा द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.