लेखणी बुलंद टीम:
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चे उलटी गिनती सुरू झाली आहे. आयपीएल 2025 चा थरार 10 दिवसांनी म्हणजेच 22 मार्चपासून रंगणार आहे, तर अंतिम सामना 25 मे 2025 रोजी खेळला जाईल. आयपीएल 2025 चा पहिला सामना गतविजेता केकेआर आणि आरसीबी संघात खेळला जाणार आहे. त्याआधी सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम इंडिया स्टार खेळाडू आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या एका फोटोच्या नादात बॉलिवूडचे दोन दिग्गज आमिर खान आणि रणबीर कपूर भर पार्टीत भिडले. शेवटी भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माने मध्यस्थी केली आणि विषय संपला. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडिओ ड्रीम-11 च्या जाहिरातीचा आहे.
खरंतर, आयपीएल 2025 च्या आधी, टीम इंडियाच्या खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्सचा एक जाहिरात व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान, रणबीर कपूर, अरबाज खान आणि जॅकी श्रॉफ दिसत आहेत. जे ड्रीम 11 च्या जाहिरातीसाठी एकत्र आले होते.
जाहिरातीची सुरुवात क्रिकेटपटू ऋषभ पंत आमिरकडे येऊन म्हणतो की, मला एक फोटो हवा आहे, पण तुमच्यासोबत नाही तर रणबीरसोबत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हसायला लागतो, पण आमिर नाराज न होता म्हणतो हो, नक्कीच तो फक्त एक फोटो नाही तर पप्पी पण देईल, तो आपला स्वतःचा मुलगा आहे.
मग आमिर रणबीरकडे जातो आणि म्हणतो, हा तुमच्या पिढीतील सर्वात मोठा स्टार आहे, ‘रणबीर सिंग’…. मग रोहित शर्मा म्हणतो की, तो सिंग सर नाही, तो कपूर आहे. आता हे ऐकल्यानंतर रणबीरही रागावतो आणि हात जोडून तिथून निघून जातो. तो हार्दिक पांड्याकडे जातो आणि म्हणतो, मी त्याला सलमान म्हणू का?
यानंतर, दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो, दोघेही एकमेकांच्या चित्रपटांची नावे सांगतात, गजनी ते अॅनिमल. या जाहिरातीत जॅकी श्रॉफ, आर अश्विनसह अनेक क्रिकेटपटू आणि अभिनेते तेथे असतात. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेली ही जाहिरात खुप मनोरंजक आहे. काही नेटकऱ्यांनी यावर टिपणी सुद्धा केली आहे.
एका नेटकऱ्याने लिहिलं की- उफ्फ, एकाच फ्रेममध्ये सर्व चॅम्पियन्स. खूप छान आहे भाऊ. चित्रपट नसले तरी, निदान बऱ्याच काळानंतर आम्हाला काही चांगल्या जाहिराती पाहायला मिळाल्या. ही जाहिरात पाहिल्यानंतर चाहते आमिर आणि रणबीरला एकत्र चित्रपटात कास्ट करण्याची मागणी करत आहेत.
Rivalries ka season ek baar phirse shuru hogaya hai 🔥🔥
Sides chunne ke liye ready ho na? 😁@Dream11 #AapkiTeamMeinKaun #Ad #Collab pic.twitter.com/MoJTx4Y5hH— Rohit Sharma (@ImRo45) March 12, 2025