लेखणी बुलंद टीम:
मध्य प्रदेशात मोबाईलचा स्फोट झाल्याने नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील चौराई भागातील कलकोटी देवरी गावात ही घटना घडली. मुलाचे वडील हरदयाल सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी ते आणि त्यांची पत्नी शेतात काम करत होते. या स्फोटात आणखी एक मुलगा जखमी झाला आहे.
जखमी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा इतर मुलांसोबत घरी होता. यावेळी ते मोबाईल चार्जिंगला असताना कार्टून पाहात होते. त्यानंतर अचानक मोबाईलमध्ये स्फोट झाला. या अपघातात मुलाच्या मांडीला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर आणखी एक मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हरदयाल सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी ते पत्नीसोबत शेतात काम करत होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर आम्ही घाईघाईने घरी पोहोचलो. स्थानिक रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मुलाला छिंदवाडा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. मुलाच्या दोन्ही हातांना आणि मांडीला जखमा झाल्या आहेत.