आजकाल अनेकांना त्यांच्या करियर बाबत अनिश्चितता असते त्यामुळे करियरअची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये एक घटक वय देखील असते. पण इच्छा तिथे मार्ग असतोच या उक्तीचं अजून एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. 64 वर्षीय निवृत्त रिटायर्ट एसबीआय अधिकारी जय किशोर प्रधान ( Jay Kishore Pradhan) यांनी 2020 मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
एसबीआय बॅंकेमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावरून ते निवृत्त झाले आहेत. बॅंकिंग मध्ये आयुष्य घालवल्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी नीट परीक्षेसाठी ऑनलाईन क्लास देखील लावले. निवृत्तीनंतर पुना शिक्षण, अभ्यास सुरू करणं हे एक आव्हान असलं तरीही आता प्रधान यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.