मुंबई मध्ये बॅंडस्टॅंड बांद्रा परिसरामध्ये 53 वर्षीय मनोरूग्ण महिलेने समुद्रात उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी त्या ठिकाणी वॉचर असलेल्या पोलिस शिपाई साईनाथ देवडे यांनी महिलेला पाण्यात बुडताना पाहून उडी मारली. मुंबई पोलिसांच्या X Post वरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महिला अर्धवट शुद्धीवर असल्याने उपचाराकरिता भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.
मनोरूग्ण महिलेला पोलिसांनी दिले जीवनदान
बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत… pic.twitter.com/bzTSs4mNSJ
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 3, 2025