बोरिवलीत इमारतीत कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याने एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रातील मुंबई मधील शनिवारी सकाळी बोरिवली पश्चिम येथील एका निवासी इमारतीत कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याने एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. व एक जण जखमी झाला. या अपघातात लिफ्ट ७ मीटर खोल खड्ड्यात पडली. मुंबई अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, ढिगाऱ्यात दोन जण अडकले होते, ज्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. पोलिसांनी दोघांनाही शताब्दी रुग्णालयात नेले.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बोरिवली परिसरातील ओम प्रथमेश इमारतीची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की कार लिफ्ट सात मीटर खोल खड्ड्यात पडली, त्यात दोघे जण अडकले. शुभम मदनलाल धुरी (३०) आणि सुनजीत यादव (४५) यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. पोलिसांनी सांगितले की, त्यांना जवळच्या बीएमसी चालवणाऱ्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुरी यांना ‘मृत’ घोषित करण्यात आले आणि डोक्याला दुखापत झालेल्या यादवची प्रकृती स्थिर आहे.
स्थानिक रहिवाशांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नागरिकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनानेही ही घटना गांभीर्याने घेतली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन प्रशासनानेही दिले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *