बारामती तालुक्यात 16 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून संपवलं आपलं जीवन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील 16 वर्षीय मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे. या विद्यार्थिनीने 8 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. तिला काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता, तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीला काही जण त्रास देत असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता, तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता, त्याचबरोबर तिने नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील तो देत होता. या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, मी त्या घटनेबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय वस्तुस्थिती आहे ती समजून घेतो. मुलांनी सुद्धा गोष्टी लावून घेऊ नये, इतके टोकाचे पाऊल उचलू नये. आम्ही तक्रारीसाठी टेलिफोन नंबर दिले आहे, का तर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला वैतागल्या
संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या आहेत. उच्चभ्रू भागात दुचाकीवरून येणारा तरुण काढतोय छेड काढत चालत जाणाऱ्या महिलांना दुचाकीवरून जाताना नको त्या ठिकाणी स्पर्श करून पळ काढत असल्याची माहिती आहे. बन्सीलाला नगर भागात रोजच्या त्रासाला महिला कंटाळल्या आहेत. दोन घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *